loader
Breaking News
Breaking News
Foto

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘राज्य गोमाता दिन’ उत्साहात साजरा

दापोली(वार्ताहर)- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील, कृषी विस्तार शिक्षण विभागात, माजी उपमुख्यमंत्री ‘स्व. अजितदादा पवार’ यांच्या जयंतीनिमित्त ’राज्य गोमाता दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू ‘डॉ. संजय भावे’ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘‘स्व. अजितदादा पवार हे प्रभावी नेतृत्व, दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती आणि सकारात्मक विचारांसाठी ओळखले जात होते. देशी गाईंबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा होता. त्यामुळे स्थानिक गोवंशाचे संवर्धन करूनच त्यांना खरी श्रद्धांजली वाहता येईल,’’ असे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय तोरणे, कुलसचिव उमेश चांदिवडे, विद्यापीठ अभियंता राहुल घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना देशी गोवंश संवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मूल्यवर्धित दुग्धजन्य उत्पादनांमध्ये उद्योजकतेच्या संधी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. कृषी पदवीधरांनी केवळ नोकरीचा विचार न करता स्वयंरोजगार व गोसंवर्धनाकडे वळावे, असे आवाहन करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

कृषी विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. संतोष वरवडेकर यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना जीवनातील एन.पी.के या संकल्पनेचा संदेश दिला. ‘एन’ म्हणजे नकारात्मकता दूर करणे, ‘पी’ म्हणजे सकारात्मकता स्वीकारणे आणि ‘के’ म्हणजे सातत्याने ज्ञान संपादन करून स्वतःला सक्षम बनविणे, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाची सुरुवात देशी गाईचे पूजन, महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने झाली. सूत्रसंचालन डॉ. प्रविण झगडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. मंदार पुरी यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg