loader
Breaking News
Breaking News
Foto

पीएमश्री शाळा राजीप शाळा नं १ येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी

म्हसळा - पीएमश्री शाळा राजीप शाळा नं १ येथे आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाचा जयघोष करत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत शाळा ते गौळवाडी येथील विठ्ठल रखमाई मंदीर येथे निघालेल्या दिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संपूर्ण शाळा, मंदिर परिसर ज्ञानोबा-तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल या नामघोषाने दुमदुमून गेला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वारकरी तसेच विठ्ठल-रुक्मिणी यांच्या वेशभूषेत आकर्षक सादरीकरण केले. याप्रसंगी शाळेच्या शिक्षकांनी अभंग, भजन आणि वारकरी परंपरेवरील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितले तसेच विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायातील समता, सेवा, भक्ती आणि संस्कार यांचे महत्त्व पटवून दिले.

टाइम्स स्पेशल

गौळवाडी ग्रामस्थ अध्यक्ष अशोक काते यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत भारतीय संस्कृती आणि परंपरा जपणारे असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रामस्थांकडून खिचडी आणि दूध देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg