loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणच्या नगराध्यक्षा ‘ममता वराडकर’ यांची जिल्हास्तरीय आरोग्यवर्धिनी समितीवर निवड

मालवण(प्रतिनिधी)- सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर सदस्य म्हणून मालवणच्या ‘ममता मोहन वराडकर’ यांची निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार, ही निवड करण्यात आली असून, याबाबतचे पत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शासनातर्फे जिल्हास्तरीय आरोग्यवर्धिनी समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री नितेश राणे हे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागातील आरोग्यविषयक समस्या, अडचणी येथे सोडविल्या जातात. मालवण शहरातील आरोग्यविषयक समस्या मांडण्याच्या दृष्टीने नगराध्यक्षा वराडकर यांची निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg