loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत जैन समाजाच्या ‘मेरी आत्मा आराधना’चातुर्मासाला मंगलमय प्रारंभ

दापोली - दापोली येथील जैन समाजाच्या वतीने आयोजित ‘मेरी आत्मा आराधना’ चातुर्मास २०२६ या धार्मिक पर्वाला बुधवारी १५ जुलै सकाळी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. कोकांब आळी येथील जैन मंदिरात सकाळी ९ वाजता चातुर्मास प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी लिंबडी अजरामर संप्रदायाचे आचार्य भावचंद्रजी स्वामी यांच्या आज्ञेनुसार, कोकण सिंहनी प.पू. गुरुवर्या रश्मिनाजी महाराज यांच्या सान्निध्यात हा मंगलपाठने मंगलमय चातुर्मास प्रवेश सुरू झाला. तसेच प.पू. संबोधीजी म.सा., प.पू. सुरभीजी म.सा. आणि प.पू. सुबोधीजी म.सा. यांचीही पावन उपस्थिती लाभली. चातुर्मास प्रवेशापूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. त्यानंतर स्थानक भवनात धार्मिक विधी, प्रवचन ,बाहेरून आलेल्या पाहुण्यांचा यथोचित जैन समाज संघ दापोलीद्वारे सत्कार करण्यात आला आणि आभार प्रदर्शनाने चातुर्मास प्रवेश सोहळा संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांनी नवकारसी व गौतमप्रसादीचा लाभ घेतला. या धार्मिक सोहळ्याचे आयोजन जैन समाज संघ, दापोली (कोकण) यांच्या वतीने करण्यात आले होते. कोकणातून माणगांव, महाड, गोरेगाव, मंडणगड, केळशी, आंजर्ला, दाभोळ, वाकवली, खेड, चिपळुण, रत्नागिरी येथुन मोठ्या संख्येने जैन बांधव व भाविकांनी उपस्थित राहून, पूज्य साध्वीजींचे दर्शन, वंदन आणि जिनवाणी श्रवणाचा लाभ घेतला. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला असून, आगामी चार महिन्यांत विविध धार्मिक, आध्यात्मिक व संस्कारवर्धक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दापोली जैन समाजाचे अध्यक्ष हसमुखभाई जैन, व मंत्री मनोहरजी जैन यांनी दिली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg