loader
Breaking News
Breaking News
Foto

मुक्ताई ॲकेडमीतर्फे 2 ऑगस्ट रोजी सावंतवाडीत विदयार्थ्यांसाठी कॅरम स्पर्धा!

सावंतवाडी ( प्रतिनिधी ) सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक कै.सुर्यकांत बाळकृष्ण पेडणेकर यांच्या स्मरणार्थ मुक्ताई ॲकेडमीने शालेय विदयार्थ्यांसाठी सावंतवाडी शहर मर्यादित कॅरम स्पर्धेचे आयोजन केले आहे. खासकिलवाडा येथील पाटणकर वाड्यातील मुक्ताई ॲकेडमीच्या प्रशिक्षण केंद्रात कॅरम स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेत सावंतवाडी शहरातील शाळांमधील मर्यादित विदयार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. विदयार्थ्यांसाठी पहिल्यांदाच अशा स्पर्धेचे आयोजन करुन त्यांना प्रोत्साहन देण्याचा उददेश असल्याचे मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धा पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी अशा तीन गटात खेळविण्यात येईल. प्रत्येक गटातील चार विजेत्यांना रोख रक्कम, मेडल, चषक आणि प्रशस्तीपत्र देण्यात येईल. त्याचबरोबर प्रत्येक गटातील तीन मुलींना प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येतील. सहभाग घेणा-या विदयार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेसाठी नावनोंदणीची अंतिम तारीख शनिवार 1 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत आहे. नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी श्री.कौस्तुभ पेडणेकर मोबाईल क्रमांक 8007382783 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन सरचिटणीस सौ.स्नेहा पेडणेकर यांनी केले आहे. आयोजकांचा निर्णय सर्वांसाठी अंतिम आणि बंधनकारक राहील.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg