loader
Breaking News
Breaking News
Foto

​कलंबिस्त येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वह्या व खाऊचे वाटप

​सावंतवाडी (प्रतिनिधी):सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त प्राथमिक शाळा क्र. १ आणि शाळा क्र. २ या दोन्ही शाळांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य वह्या व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.​हा उपक्रम सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस, जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, सावंतवाडी तालुका अध्यक्ष उदय भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस सुरेश गवस यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला. ​या कार्यक्रमाप्रसंगी दोन्ही शाळांचे विद्यार्थी एकत्र आले होते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपयोगी वह्या आणि खाऊचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय कदम यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यामध्ये निवृत्त आर्मी ब्लॅक कमांडो, प्रकाश सावंत, राजेश पास्ते, अशोक पास्ते (उर्फ बाळा पास्ते), श्याम कलंबिस्कर आणि भाई सावंत यांचा समावेश होता.​यावेळी दोन्ही शाळांचा शिक्षकवर्ग, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी उपस्थितांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे आणि आयोजकांचे आभार मानले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg