loader
Breaking News
Breaking News
Foto

रामपूर येथे एकात्मिक आरोग्यवर्धीनी समितीची बैठक

वेळणेश्वर(उमेश शिंदे) - गुहागर विधानसभा मतदारसंघातील एकात्मिक आरोग्यवर्धीनी समितीची बैठक रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आ. भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी गुहागर, चिपळूण आणि खेड तालुक्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघात येणार्‍या सर्व आरोग्य संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. गुहागर तालुका आरोग्य अधिकारी गुहागर डॉ. घनश्याम जांगीड आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश खरटमोल यांनी आ. जाधव यांचे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी माजी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव, महिला आणि बाल कल्याण सभापती मयुरी शिर्के, कृषी आणि पशुधन विकास सभापती महेश नाटेकर, गुहागर पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, चिपळूण पंचायत समिती सभापती सूर्यकांत खेतले, जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, अपूर्वा बारगोडे, प्रमोद गांधी, रावी मोरे, जाई आंब्रे, चिपळूण तहसीदार प्रवीण लोकरे, गटविकास अधिकारी उमा घागरे पाटील, गुहागर गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे आणि इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

यावेळी चिपळूण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती जाधव, गुहागर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सत्यार्थ प्रकाश बळवंत, कामथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कांबळी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय सानप, रामपूरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. निकिता शिर्के, कर्मचारी, तालुका आरोग्य विभाग गुहागर, चिपळूण खेड येथील कर्मचारी उपस्थित होते. डॉ. ज्योती यादव यांनी सर्वांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg