loader
Breaking News
Breaking News
Foto

बोरज गावचे सुपुत्र व निवेदक कलाकार ‘बाळू सनगरे’ यांना माजी कॅबिनेट मंत्री रामदासभाई कदम यांनी केला सत्कार

खेड- बोरज गावचे सुपुत्र, राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार प्राप्त, उत्कृष्ट निवेदक व कलाकार तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून कोकणातील विविध सामाजिक, राजकीय आणि जनहिताच्या प्रश्नांना वाचा फोडणारे पत्रकार बाळू सनगरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय रामदासभाई कदम यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बाळू सनगरे हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता, निवेदन आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. आपल्या प्रभावी आवाजाने, ओघवत्या निवेदनशैलीने आणि सामाजिक जाणिवेने त्यांनी कोकणातील विविध कार्यक्रमांमध्ये आपल्या कार्याची वेगळी छाप निर्माण केली आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच जनहिताच्या विषयांवर सातत्याने आवाज उठवत त्यांनी पत्रकारिता क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बोरज गावातून आपल्या कार्याची सुरुवात करून पत्रकारिता आणि निवेदनाच्या माध्यमातून संपूर्ण कोकणात आपला ठसा उमटविणारे बाळू सनगरे हे एक उत्तम निवेदक, कलाकार आणि निर्भीड पत्रकार म्हणून परिचित आहेत. स्थानिक पातळीवरील जनतेच्या समस्या, सामाजिक प्रश्न, विकासकामे, पर्यावरण, औद्योगिक प्रदूषण तसेच कोकणातील विविध प्रश्नांना त्यांनी आपल्या वृत्तांकनाच्या माध्यमातून सातत्याने प्रसिद्धी दिली आहे.

टाइम्स स्पेशल

त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार तसेच विविध सामाजिक आणि कला क्षेत्रातील पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आपल्या प्रभावी निवेदनातून कार्यक्रमांना रंगत आणणे, बातम्यांच्या माध्यमातून जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे, ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्‌ये आहेत. पत्रकार बाळू सनगरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांनी त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. बाळू सनगरे यांनी पत्रकारिता, निवेदन आणि कला क्षेत्रात आणखी मोठे यश संपादन करावे, समाजासाठी त्यांचे कार्य अधिक व्यापक व्हावे आणि त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व उज्ज्वल भवितव्य लाभावे, अशा शुभेच्छा रामदासभाई कदम यांनी दिल्या. रामदासभाई कदम यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि लोकप्रिय नेत्याने शुभेच्छा देणे ही फार मोठी गोष्ट आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg