loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये ‘पंढरीची वारी’ उपक्रमातून संस्कार, संस्कृती आणि भक्तीचा अनोखा संगम.

खेड(प्रतिनिधी)- आषाढी एकादशीचे औचित्य साधून रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि जीवनमूल्यांची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी ‘पंढरीची वारी’ हा विशेष उपक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या सुमधुर भक्तिगायनाने झाली. विठ्ठल... विठ्ठल... च्या अखंड नामगजराने आणि भक्तिरसाने संपूर्ण सभागृह भारावून गेले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंग आणि भक्तिगीतांमुळे उपस्थितांना प्रत्यक्ष पंढरपूरच्या वारीचा अनुभव मिळाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यानंतर विद्यार्थ्यांनी ‘भक्त पुंडलिक’ यांच्यावर आधारित प्रभावी नाटिका सादर केली. या नाटिकेतून विठोबा केवळ मंदिरातील मूर्तीत नसून तो प्रत्येकाच्या सत्कर्मात, सेवाभावात आणि आई-वडिलांच्या सेवेत वसतो, हा जीवनाला दिशा देणारा संदेश अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला. विद्यार्थ्यांच्या अभिनयाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात विठ्ठल-रुक्मिणी यांच्या भक्तीवर आधारित आकर्षक व मनमोहक नृत्याविष्कारही सादर करण्यात आला. पारंपरिक वेशभूषा, भावपूर्ण सादरीकरण आणि सुरेल संगीतामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत टाळ, मृदंग, भगव्या पताका आणि नामगजरासह शिस्तबद्ध दिंडी काढून वारकरी संप्रदायाची परंपरा जिवंत केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नम्रता, शिस्त, सहकार्य, समता, सेवाभाव, नेतृत्वगुण, सामाजिक जबाबदारी आणि भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान यांसारख्या मूल्यांची जोपासना करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (नीप २०२०) मधील अनुभवाधारित शिक्षण, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि भारतीय ज्ञानपरंपरा या संकल्पनांना अनुसरून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय आणि संस्कारमय अनुभव ठरला. उपस्थित पालक, शिक्षक आणि मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे तसेच उपक्रमाच्या संकल्पनेचे मनापासून कौतुक केले. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg