loader
Breaking News
Breaking News
Foto

कर्नाटकचे प्रल्हाद जोशी नवे शिक्षण मंत्री

नवी दिल्ली : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सध्या प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी प्रल्हाद जोशी यांना त्यांच्या विद्यमान मंत्रालयांसोबतच शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा आदेश जारी केला आहे. यानुसार प्रल्हाद जोशी त्यांच्या विद्यमान जबाबदाऱ्यांसोबतच शिक्षण मंत्रालयाचे कामकाजही पाहणार आहेत. मात्र भविष्यात नवीन शिक्षणमंत्र्याच्या नावाची घोषणा झाल्यानंतर जोशी यांना या जबाबदारीतून मुक्त केले जाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रल्हाद जोशी हे कर्नाटकातील धारवाड मतदारसंघाचे खासदार आहेत. सध्या ते ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा या मंत्रालयांचे केंद्रीय मंत्री आहेत. तसेच ते इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे अध्यक्षदेखील आहेत. आता पुढील काही काळ त्यांच्याकडे शिक्षण खात्याचीही जबाबदारी असणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg