दोडामार्ग (प्रतिनिधी) - आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा, दोडामार्ग नं. १ यांच्या वतीने आज भव्य आणि उत्साहपूर्ण दिंडीचे आयोजन करण्यात आले. शाळेपासून प्रारंभ झालेली ही दिंडी दोडामार्ग शहरातील प्रमुख बाजारपेठेतून भक्तिमय वातावरणात मार्गक्रमण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंग, वीणा आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात दिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल" अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सहभागामुळे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साहामुळे दिंडीला विशेष आकर्षण प्राप्त झाले.
या दिंडीत विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळा आणि पालक यांच्यातील सुसंवाद व सहकार्याचे सुंदर दर्शन या निमित्ताने घडले. बाजारपेठेतील नागरिकांनीही दिंडीचे स्वागत करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये संतपरंपरा, वारकरी संप्रदाय, भारतीय संस्कृती आणि सामाजिक ऐक्याची भावना दृढ व्हावी, तसेच आपल्या संस्कृतीची ओळख प्रत्यक्ष अनुभवातून व्हावी या उद्देशाने शाळेकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आधुनिक शिक्षणाबरोबरच संस्कारमूल्ये जोपासण्याचा संदेश या दिंडीतून प्रभावीपणे देण्यात आला.
दोडामार्ग केंद्रशाळा नं. १ ही शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि मूल्याधिष्ठित उपक्रम राबविणारी शाळा म्हणून ओळखली जाते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य दिंडीने विद्यार्थी, पालक आणि नागरिकांच्या मनावर भक्ती, संस्कार आणि एकात्मतेची अविस्मरणीय छाप उमटविली.



























1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.