loader
Breaking News
Breaking News
Foto

लांज्यात ४ वर्षीय मुलीवर कुत्र्यांचा हल्ला, पाठलाग करुन चावा

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - भटक्या कुत्र्यांनी लांजा शहरातील सार्दळवाडी येथील चार वर्षीय मुलीवर हल्ला करून चावा घेऊन जखमी करण्याची घटना आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या कुत्र्यांची भिती लांजा शहरात निर्माण झाली असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद भाईशेट्ये यांनी केली आहे. सार्दळवाडी येथील स्वम्भवी समिर तानवडे वय वर्ष ४ ही शेजारच्या घरात जात असताना दहा कुत्र्यांनी मिळुन अंगावर धावत येऊन पाठीला हाताला चावा घेतला. झुंडीने आलेल्या कुत्र्यांना पहून मुलगी घाबरून गेली. तीने आरडा ओरडा करताच पालकांनी धाव घेऊन मुलीची कुत्र्यांपासून सुटका केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कुत्रे एवढे निर्ढावलेले आहेत की, त्यांना भिती राहीलेली नाही. थेट अंगावर धावून येतात. घराजवळ सदर प्रकार घडल्याने मुलगी वाचली आहे. शहरात कुत्र्यांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे लहान मुलांना एकटे बाहेर पाठवणे भितीदायक झाले आहे. शहरात कुत्रे झुंडीने बाजारपेठेतून गल्ली बोळावून फिरत असल्याने त्यांना हटकल्यास ही जात नाहीत. त्यामुळेच कुत्र्यांची अधिक भिती निर्माण झाली आहे. नगरपंचायतीकडून या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg