loader
Breaking News
Breaking News
Foto

तरवळ मायंगडेवाडी येथील सर्वेश मायंगडे याचा जिल्हा पोलिस अधिक्षक यांचेकडून सन्मान

रत्नागिरी - पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे तरवळ (मायंगडेवाडी) येथील एका घरात झालेल्या चोरीच्या घटनेत आरोपीचे मोबाईलद्वारे चित्रीकरण करून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धाडसाने त्याचा पाठलाग करत रत्नागिरी पोलीस दलास आरोपीस पकडण्यासाठी मोलाचे सहकार्य करणारे सर्वेश संदेश मायंगडे याचा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपल्या तरवळ गावामध्ये बाहेरुन चादरी घेवून विक्रीसाठी आलेल्या दुचाकीचालकाने घरात घुसून चोरी केली, तेव्हा मायंगडे वाडीतील सर्वेश मायंगडे घरात होता. वाडीत इतर कोणीच नव्हते, त्यामुळे चोरट्यांना बघून सर्वेश प्रथम दचकून पडवीतच दबा धरुन राहिला. चोरटे जसे, घरातून बाहेर पडले, तसे सर्वेशने दुरदूरुन लपून त्यांचा पाठलाग केला. शेवटी काही ग्रामस्थ सर्वेशला भेटले आणि त्यांनी सर्वेश सोबत दुचाकीवरुन निवळीपर्यंत त्याचा पाठलाग केला आणि चोरट्यांना पकडले. या धाडसी कार्याबद्दल सर्वेश संदेश मायंगडे याला त्याच्या जाकादेवी माध्यमिक शाळेच्या शिक्षकांनी शाब्बासकी दिली. तसेच ग्रामस्थांनीही शाबासकी दिली. या संदर्भात टाईम्स डिजीटलमधून वृत्त प्रकाशीत करण्यात आले आणि सर्वेश मायंगडेच्या कार्याचा सर्वदूर गौरव झाला. मुंबईच्या चाकरमान्यांनीही सर्वेशचे कौतुक केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg