वैभववाडी, (प्रतिनिधी) - रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या रोटरी वर्ष २०२६–२७ चा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. वर्षातील या सोहळ्यात Rtn. प्रणय तेली यांनी Installing Officer म्हणून पदग्रहणाची औपचारिकता पार पाडली. या प्रसंगी Assistant Governor Rtn. बिपीनचंद्र गांधी, Assistant Governor Rtn. संजय रावराणे, Assistant Governor Rtn. अभिषेक माने, Rtn Dr. विद्याधर तायशेट्ये, डिस्ट्रिक्ट ३१७० मधील सर्व सचिव , विविध क्लबचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार, रोटेरियन, मान्यवर तसेच पदाधिकाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी Rtn. स्नेहल रावराणे यांनी अध्यक्ष, Rtn. दिनकर केळकर यांनी सचिव आणि Rtn. नेहा रावराणे यांनी खजिनदार म्हणून पदभार स्वीकारला. मावळते अध्यक्ष Rtn. सचिन रावराणे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या कार्यकाळात सर्व सदस्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आणि नवीन नेतृत्वाखाली क्लब सेवा, मैत्री व सामाजिक बांधिलकीची परंपरा अधिक प्रभावीपणे पुढे नेईल, असा विश्वास व्यक्त केला. नवीन अध्यक्ष Rtn. स्नेहल रावराणे यांनी रोटरीच्या "Service Above Self" आणि डिस्ट्रिक्ट थीम "Creating Lasting Impact" या संकल्पनांना साकार करत आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, युवक विकास आणि समाजोपयोगी सेवाप्रकल्प अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
सोहळ्यादरम्यान रोटरीच्या Vocational Service Award अंतर्गत "Guardian of Peace" या विशेष सन्मानाने पोलीस उपनिरीक्षक आगा साहेब यांचा त्यांच्या प्रदीर्घ, कर्तव्यनिष्ठ, लोकाभिमुख व समाजाभिमुख सेवेसाठी गौरव करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करून त्यांचे कौतुक करण्यात आले. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० च्या अखेरच्या रोटरी वर्षातील हा पदग्रहण सोहळा सेवा, सन्मान, प्रेरणा आणि सामाजिक बांधिलकीचा अविस्मरणीय उत्सव ठरला.

































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.