loader
Breaking News
Breaking News
Foto

शारदा मंदिर (मराठी माध्यम) विद्यार्थ्यांची विठ्ठल मंदिरात भक्तिमय आषाढी वारी

कर्जत, (जयेश जाधव): कर्जत शहरातील शारदा मंदिर (मराठी माध्यम) शाळेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारीचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. वारकरी परंपरेचे महत्त्व विद्यार्थ्यांना लहान वयातच समजावे व भक्ती, संस्कार आणि अध्यात्माची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांनी दहिवली येथील श्री विठ्ठल मंदिरात आषाढी वारी काढली. यावेळी इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत भजन, अभंग व विठ्ठल भक्तीगीते सादर करून मंदिर परिसर भक्तिरसाने भारावून टाकला. दिविजा पुरोहित यांनी विद्यार्थ्यांना आषाढी वारीचे महत्त्व व वारकरी परंपरेविषयी मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमाची संकल्पना संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली किसवे यांनी मांडली. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रद्धा जामघरे यांनी केले. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अतिशय भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सहभागाचे व सादरीकरणाचे मनापासून कौतुक केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg