रत्नागिरी (जमीर खलफे) : गेल्या ३६ दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाल्यानंतर रत्नागिरीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मान्य करण्यास केंद्र सरकारला भाग पाडण्यात आंदोलनकर्त्यांना यश आल्याची भावना व्यक्त करत, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कोकरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे आणि महिला जिल्हाध्यक्ष वीरश्री बेटकर यांच्या नेतृत्वाखाली शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारमंचाच्या पदाधिकाऱ्यांनी, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांसह विजय उत्सव साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. त्यानंतर आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. महापुरुषांच्या विचारांना वंदन करत उपस्थितांनी फटाक्यांची आतषबाजी केली आणि विद्यार्थ्यांच्या संघर्षाला मिळालेल्या यशाचा आनंद व्यक्त केला. दोन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ रत्नागिरीत काढण्यात आलेल्या ऐतिहासिक मोर्च्याचा उल्लेख करत उपस्थितांनी हा विजय केवळ विद्यार्थ्यांचा नसून शिक्षणव्यवस्थेत उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेसाठी लढणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा असल्याची भावना व्यक्त केली.
विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण, शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने झालेल्या आंदोलनामुळे शासनाला निर्णय घ्यावा लागला, असेही यावेळी नमूद करण्यात आले. या विजय उत्सवाचे यशस्वी नियोजन आणि आयोजन करण्यासाठी राजेंद्र जाधव, अभिजीत हेगशेट्ये, अशोक भाटकर, अश्फाक झारी, नौसिन काजी, मयुरेश पाटील, विलास कदम, अश्फाक कादरी, जैनुल सारंग, बिपीन आयरे, अनिता चव्हाण, राधिका जाधव, जुबेदा बुकारी, विना खातू, श्रावणी पालकर, गीता राठोड, साक्षी कांबळे, रचना कांबळे, सोनलताई घाग, प्रथमेश गावकर आणि परशुराम कदम यांनी परिश्रमपूर्वक नियोजन करत मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या योगदानामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि यशस्वी वातावरणात पार पडल्याबद्दल आयोजकांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.






































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.