loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडच्या वर्षा मॅरेथॉनमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची धाव; ‘रन फॉर हेल्थ’चा दिला संदेश

खेड (दिलीप देवळेकर) - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वतः सहभागी होत स्पर्धकांसोबत धाव घेतली. यावेळी त्यांनी उपस्थितांना नियमित व्यायाम, धावणे आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन करत ‘रन फॉर हेल्थ’ हा संदेश दिला. त्यांच्या सहभागामुळे स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित झाला. शहरातील विविध वयोगटातील नागरिकांनी या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प केला. आयोजकांनीही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यात अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अख्या कोकणातील मॅरेथॉन स्पर्धेतील गर्दी चा उच्चांक तोडणारी रेकॉर्ड ब्रेक गर्दीची खेड लायन्स क्लब आयोजित लायन वर्षा मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गृह राज्यमंत्री योगेश कदम, भाजपा नेते ॲड.वैभव खेडेकर, उद्योजक बशीर हजवानी यांचा सहभाग लाभला. या वर्षा मॅरेथॉनमध्ये राज्याच्या विविध भागातून विविध वयोगटातील स्पर्धक यात सहभागी झाले होते. यावेळी विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. मॅरेथॉनच्या माध्यमातून सुदृढ आरोग्य जपण्याची जागृती निर्माण व्हावी यासाठी अशा प्रकारचा कौतुकास्पद कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अध्यक्ष अविनाश दळवी व सर्व लायन्स क्लब ऑफ खेड सिटी चे सदस्य व आयोजकांचे कौतुक केले.

टाइम्स स्पेशल

मुकादम लँडमार्क खेड इथून सुरू झालेल्या या मॅरेथॉनवेळी खेड नगर परिषदेचे नगरसेविकास वैभवी वैभव खेडेकर, रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, उद्योजक शा. भुरमल ज्वेलर्सचे मालक पारस जैन, लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष अविनाश दळवी, उत्तम कांबळे, संदीप मोरे, पंकज शहा, राजेश जोयसर, मुकादम डेव्हलपरचे मालक शमशुद्दीन मुकादम, यांच्यासह खेड विद्यार्थी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg