loader
Breaking News
Breaking News
Foto

राहुल गांधींच्या पुतळा दहनप्रकरणी काँग्रेसची कारवाईची मागणी

खेड : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आक्षेपार्ह घोषणाबाजी करण्यात आल्याचा आरोप करत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने पोलिसांकडे केली आहे. जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने खेड पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले. निवेदनात २३ जुलै रोजी भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सार्वजनिक दहन करण्यात आले. तसेच आक्षेपार्ह व चिथावणीखोर घोषणाबाजी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रकारामुळे सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याची शक्यता निर्माण झाल्याचे काँग्रेसने नमूद केले आहे. लोकशाही व्यवस्थेत मतभेद व्यक्त करण्यासाठी वैधानिक मार्ग उपलब्ध असताना सार्वजनिक ठिकाणी पुतळा दहन व आक्षेपार्ह घोषणाबाजी करणे गंभीर असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. काँग्रेसने वैभव खेडेकर व संबंधित कार्यकर्त्याविरुद्ध चौकशी करून लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करावा, सीसीटीव्ही, व्हिडिओ, छायाचित्रे व सोशल मीडियावरील पुरावे तपासून संबंधितांची ओळख पटवावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

टाइम्स स्पेशल

यावेळी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग, जिल्हा सरचिटणीस फैसल देसाई, गौस खतीब, नगरसेवक साजिद सरगुरो, साफ गोटे, निर्मला जाधव, तालुकाध्यक्ष अजीम सुर्वे, तालुका सरचिटणीस प्रफुल्ल शेवरकर, माजी नगरसेवक बशीर मुजावर, सीमा शिंदे, मंगेश भैरवकर, राबिया जसनाईक, नाझीमा तांबे, मुमताज तांबे, सुवर्णा गमरे आदी उपस्थित होते. दरम्यान, या निवेदनावर पोलिसांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया किंवा कारवाईबाबतची माहिती समोर आलेली नाही. यावेळी खेड तालुका अध्यक्ष अझीम सुर्वे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस फैसल देसाई,जिल्ह्याची चिटणीस सीमा ताई जाधव, तालुका सरचिटणीस प्रफुल्ल शेवरकर, शहर अध्यक्ष मंगेश भैरवकर, महिला तालुका अध्यक्ष राबिया जसनाईक, शहर महिला अध्यक्ष नाझीमा तांबे, उजमा तिसेकर, तौफिक पोत्रीक, गौसभाई खतीब. व असंख्य काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg