loader
Breaking News
Breaking News
Foto

आषाढी एकादशीनिमित्त मालवणात विठ्ठलभक्तीचा जल्लोष

मालवण, (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीनिमित्त मालवण तालुक्यात सर्वत्र विठ्ठलनामाचा अखंड गजर घुमत भक्तिमय वातावरण निर्माण झाले. दांडी येथील वारकरी दिंडी, खैदा येथील 'प्रती पंढरपूर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरातील धार्मिक कार्यक्रम तसेच शहर व परिसरातील विविध मंदिरांमध्ये झालेल्या भजन, कीर्तन आणि नामस्मरणामुळे संपूर्ण तालुका विठ्ठलभक्तीने भारावून गेला. दांडी येथील श्रीकृष्ण मंदिरात पहाटेपासून पूजाअर्चा, काकड आरती, हरिनाम जप व भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. दुपारी ढोल-ताशे, टाळ-मृदुंगाच्या गजरात श्रीकृष्ण मंदिरातून भव्य वारकरी दिंडीला प्रारंभ झाला. ही दिंडी श्री मोरेश्वर (मोरयाचा धोंडा) मार्गे दांडेश्वर मंदिरापर्यंत पार पडली. दिंडीत शेकडो वारकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच बालवारकरी सहभागी झाले होते. भगव्या पताका, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि "जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल"च्या अखंड घोषणांनी दांडी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्री मोरेश्वर येथे ग्रामस्थांनी पारंपरिक धार्मिक विधी आणि नवसपूर्तीचे कार्यक्रम पार पाडले. त्यानंतर दिंडी दांडेश्वर मंदिरात पोहोचून हरिनाम सप्ताह, आरती आणि महाप्रसादाने सोहळ्याची सांगता करण्यात आली. दरम्यान, मालवण तालुक्यातील खैदा येथील ग्रामदैवत श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात, 'प्रती पंढरपूर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदिरात पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दिवसभर पूजाअर्चा, हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिभावात पार पडले.

टाइम्स स्पेशल

याशिवाय मालवण शहरातील मेढा, देऊळवाडा, गवंडीवाडा, धुरीवाडा तसेच इतर भागांतील श्री विठ्ठल-रखुमाई आणि श्रीकृष्ण मंदिरांमध्येही आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिवसभर हरिनामाचा गजर, भजन-कीर्तन, आरती आणि धार्मिक कार्यक्रमांत भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विठ्ठल-रखुमाईच्या चरणी भक्तिभाव व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg