तिलारी (प्रतिनिधी) : दोडामार्ग–विजघर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामात ठेकेदाराकडून होत असलेल्या निष्काळजीपणामुळे हा रस्ता वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. मेढे परिसरात रस्त्याची एक बाजू खोदून ठेवण्यात आली असून, सुमारे एक ते दीड फूट खोल चर पडल्याने रस्ता दोन स्तरांमध्ये विभागला गेला आहे. यामुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.
विशेष म्हणजे, धोकादायक ठिकाणी कोणतेही इशारा फलक, रिफ्लेक्टर किंवा सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने नवख्या वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. दोडामार्ग ते भेडशी मार्गावरील काही ठिकाणी सुधारणा झाल्याचे दिसून येत असले, तरी आवाडे ते विजघर या पट्ट्यात कामादरम्यान वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
याबाबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबू गवस यांनी संबंधित यंत्रणा व ठेकेदाराने तातडीने रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी केली आहे. सुरक्षिततेच्या आवश्यक उपाययोजना त्वरित न झाल्यास नागरिकांसमवेत आंदोलनाचा विचार करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

















































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.