देवगड - देवगड तालुक्यातील श्रीक्षेत्र तारामुंबरी येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री संत सोपानकाकांच्या पायी वारीची सांगता सोमवार, दि. २७ जुलै रोजी भक्तिमय वातावरणात होणार आहे. या सोहळ्यास वारकरी, भाविक आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर व पायी वारी समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता श्री ब्राह्मणदेव मंदिर येथे वारकऱ्यांच्या आगमनाने होणार असून, तेथून पायी वारीचे श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर, तारामुंबरीकडे प्रस्थान होईल. मंदिरात आगमनानंतर गंगापूजन आणि वीणापूजन हा धार्मिक विधी पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी ७ वाजता सांजआरती आणि ७.१५ वाजता हरिकीर्तन होणार आहे. या कीर्तनाने पायी वारीची विधिवत सांगता करण्यात येणार आहे.
वारकरी परंपरेचा गौरव आणि विठ्ठल भक्तीचा संदेश जपणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात भाविकांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर व पायी वारी समितीचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


























































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.