वेळणेश्वर (उमेश शिंदे): आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने पीएमश्री वेळणेश्वर प्रशालेत आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या सहभागातून भक्तिमय आनंदवारीचे आयोजन करण्यात आले. साखरी आगर केंद्राचे केंद्रप्रमुख प्रभाकर कांबळे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विश्वजीत जामसुतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंदवारीचा शुभारंभ करण्यात आला. टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठल नामाचा अखंड जयघोष आणि अभंग-हरिपाठाच्या सुरांनी शाळेचा व वेळणेश्वर मंदिराचा परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला. वारीमध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी विविध संतांच्या पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून संतांच्या विचारांचा संदेश देण्यात देण्यात आला.
विठ्ठल नामस्मरण, अभंग गायन, हरिपाठ पारंपरिक फुगड्या तसेच भजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा जिवंत केली. या वारीत विविध विविध भक्ती गीतांच्या चालीवर विद्यार्थ्यिनींनी केलेले नृत्य पारंपरिक फुगड्या संत ज्ञानेश्वर महाराजांची सजवलेली पालखी, विद्यार्थ्यांनी केलेले पालखी नृत्य विशेष लक्षवेधी ठरले. यावेळी भारतीय संस्कृती, संत परंपरा, शिस्त, एकात्मता, पर्यावरण संवर्धन आणि साक्षरतेचा संदेशही प्रभावीपणे देण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव, नैतिक मूल्ये, सामाजिक जाणीव, सहकार्याची वृत्ती आणि भारतीय संस्कृतीविषयी अभिमान निर्माण करणे. नवभारत साक्षरता अभियानाची जनजागृती करणे हा होता.
वारीमध्ये प्रशालेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सतीश नलावडे, पदवीधर शिक्षक बिपिन विचारे, उपशिक्षक बाबासाहेब राशिनकर, उपशिक्षिका सुलक्षणा राशिनकर करडे, उपशिक्षिका भारती गोवेकर, वावरे शिक्षण सेविका प्रियंका पवार, अंजूम शेख, तेजस्विनी जगताप, विद्यार्थी पालक व ग्रामस्थ बंधु भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सांगता श्री देव वेळणेश्वर मंदिरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मुर्तींचे पूजन करून आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करून विद्यार्थ्यांना फराळ वाटप करून करण्यात आली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाचा सांस्कृतिक वारसा प्रत्यक्ष अनुभवता आला असून, भक्ती आणि संस्कारांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रशालेच्या प्रयत्नाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



























































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.