loader
Breaking News
Breaking News
Foto

विनायक राऊत यांची कै. राजेश सावंत यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

रत्नागिरी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी येथील कै. राजेश सावंत यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी सावंत कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेत त्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला. रत्नागिरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहिलेले कै. राजेश सावंत यांच्या अकस्मात निधनाने रत्नागिरीच्या सामाजिक व राजकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. सुमारे पंचवीस वर्षांच्या सार्वजनिक जीवनात त्यांनी आपल्या विनम्र, सुसंस्कृत आणि आपुलकीच्या स्वभावाने सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राजकीय भूमिका आणि विचारधारा वेगळ्या असल्या तरी माणुसकीच्या नात्याला आणि परस्पर आदराला कधीही राजकीय मतभेदांचा अडथळा येऊ दिला नाही, अशी भावना विनायक राऊत यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस, जिल्हा संघटक तथा जिल्हा पंचायत परिषद सदस्य संतोष थेराडे, तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, विभागप्रमुख किरण तोडणकर, साजिद पावसकर, विजय कोवळेकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

रत्नागिरीच्या सार्वजनिक जीवनातील एक सुसंस्कृत, सत्शील आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. कै. राजेश सावंत यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि सावंत कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg