मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलच्या पंचकोश आधारीत गुरुकुल विभागामध्ये शनिवार दिनांक ०८ ऑगस्ट २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या निवासी शिबिराची सुरुवात क्रांती दिन पूर्व संध्ये निमित्त आयोजित ‘क्रांतीचा गर्जा जयजयकार’ या कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता पाचवीतील मुलांनी गायलेल्या ‘गरजा जयजयकार क्रांतीचा गरजा जयजयकार’ या कुसुमाग्रजांच्या प्रसिद्ध गाण्याने झाली. यानंतर संगमेश्वर धामणी येथील प्रसिद्ध प्रवचनकार,व्याख्याते आणि इतिहास अभ्यासक श्रीनिवास पेंडसे यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारकाचे योगदान याविषयी व्याख्यानातून विद्यार्थ्यांसमोर १८५७ च्या राष्ट्रीय उठावापासून टप्प्याटप्प्याने होणार्या वेगवेगळ्या क्रांतिकार्याचा आढावा घेतला. उत्तरार्धात गुरुकुल मधील दहा विद्यार्थ्यांनी व्याख्याते श्री. श्रीनिवास पेंडसे यांच्याशी मुलाखत रुपी संवाद साधून त्यांच्या जीवनकार्या आणि यशाचा आलेख मुलाखतीतून समजून घेतला.
मुलाखतीची पूर्वतयारी म्हणून मागील आठवड्याभरात विद्यार्थ्यांनी वाचनातून आणि इंटरनेटच्या माध्यमातून श्रीनिवास पेंडसे यांच्याबद्दल माहिती संकलित करून त्या आधारे जवळपास ७० प्रश्न तयार केले आणि ह्या प्रश्नांपैकी निवडक १५ प्रश्नांची प्रश्नावली विद्यार्थ्यांनी मुलाखतीसाठी तयार केली. विद्यार्थ्यांनी धिटाईने विचारलेल्या प्रश्नांनी मुलाखत अधिक रंगतदार झाली. या कार्यक्रमासाठी गुरुकुलातील विद्यार्थ्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते. गुरुकुल शाळा समिती अध्यक्षा सारिका भावे, प्रशालेचे मुख्याध्यापक संजय बनसोडे आणि विभाग प्रमुख मंगेश मोने यांच्या हस्ते श्रीनिवास पेंडसे यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता म्हणून गुरुकुलातील आठवी मधील विद्यार्थी वेदांत टाकळे यांनी काढलेले पेंडसे यांचे व्यक्तिचित्र आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुकुलातील अध्यापिका दीपा गद्रे यांनी केले. निवासी शिबिरामध्ये रात्रीचे भोजनोत्तर सत्रात गुरुकुलातील विद्यार्थी विद्यार्थिनी प्रतिनिधी आणि मंत्रिमंडळ निवडणूक संपन्न झाली. अभ्यास,शिस्त,सांस्कृतिक क्रीडा,आरोग्य आणि परिपाठ अशा विभागाचे मंत्री आणि विद्यार्थी विद्यार्थिनी प्रतिनिधी यांची निवड करण्यासाठी आयोजित केलेल्या निवडणुक कार्यक्रमातून प्रत्यक्ष चालणारी निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देऊन समजून सांगण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांना क्रांतिकारक चाफेकरांचा चित्रपट दाखवण्यात आला.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.