रत्नागिरी ( प्रतिनिधी ) शहरातील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिर देवस्थानात श्रावणी मंगळागौर निमित्त सोम. दि. २४ ते बुध. दि. २६ ऑगस्ट २०२६ असे सलग ३ दिवस भगिनींच्या झिम्मा फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. तरी या स्पर्धेत भगिनींच्या झिम्मा फुगडी मंडळांनी आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.रत्नागिरीतील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिरात दरवर्षी श्रावण महिन्यात भगिनींसाठी मंगळागौर कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. सालाबादप्रमाणे यावर्षीही रत्नागिरीतील श्रीराम मंदिर देवस्थानात श्रावण मंगळागौर निमित्त भगिनींच्या झिम्मा फुगडी स्पर्धा सोम. दि. २४ ते बुध. दि. २६ ऑगस्ट २०२६ असे सलग ३ दिवस आयोजित करण्यात आल्या आहेत.
या स्पर्धा शहरी व ग्रामीण अशा २ विभागात घेतल्या जातील. या स्पर्धा दि. २४ ते २६ ऑगस्ट या ३ दिवसात दररोज सायं. ४ ते ८ या वेळेत संपन्न होतील. स्पर्धेत सहभागी होणार्या भगिनींच्या प्रत्येक ग्रुपला सादरीकरणासाठी ३० ते ४५ मिनिटांचा कालावधी देण्यात येईल. या स्पर्धांचे नियोजन करण्यासाठी आज श्रीराम मंदिरात विशेष बैठक संपन्न झाली. या बैठकीला सौ. मंदा चौगुले, राजश्री लोटणकर, विशाखा सुर्वे, अर्चना उतेकर, नंदिनी चाकणे, संगीता येलगुडकर, सुरेखा घोरपडे, प्रतिक्षा साळवी, शितल भोसले, माया तांबे, यज्ञा विरकर, मिताली भिडे, विशाखा सावंत, डॉ. निशिगंधा पोंक्षे आदी मान्यवर भगिनी उपस्थित होत्या.
या स्पर्धेसाठी नावनोंदणी शनि. दि. २२ ऑगस्ट २०२६ पर्यंत श्रीराम मंदिर, श्रीराम आळी, रत्नागिरी येथे करावयाची आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. स्पर्धेत यशस्वी झालेल्या व सहभागी होणार्या भगिनी मंडळांना आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख पारितोषिक गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत नावनोंदणी करण्याकरीता संपर्क पुढीलप्रमाणे- १) श्री. सुनील नलावडे - मो. ९८२२३८५०८४, २) सौ. मंदा चौगुले- मो. ९४२३८७५११४, ३) सौ. माया तांबे- मो. ९५४५२३५२२५. श्रीराम मंदिर देवस्थानतर्फे श्रावणी मंगळागौर निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भगिनींच्या या झिम्मा फुगडी स्पर्धेत रत्नागिरी शहर व परिसरातील तसेच जिल्ह्यातीलही भगिनींच्या मंडळांनी आवर्जून सहभागी व्हावे आणि स्पर्धेचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन श्रीराम मंदिर देवस्थानच्या अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर यांनी केले आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.