loader
Breaking News
Breaking News
Foto

महाड-विन्हेरे मार्गावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक; 14 प्रवासी जखमी

महाड ( धम्मशील सावंत ) रायगड जिल्ह्यातील महाड-विन्हेरे मार्गावर कुरळे देविका वाडी परिसरात आज सकाळी दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली.रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्याने दोन्ही बस एकमेकींवर आदळल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात बसमधील 14 प्रवासी जखमी झाले असून, काही प्रवाशांना किरकोळ मुक्कामार लागल्याचे समजते.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष अजय शेठ महाडिक यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांसाठी ॲम्बुलन्सची व्यवस्था करून त्यांना उपचारासाठी महाड येथील रुग्णालयात हलवण्यात आले.अपघाताची अधिक माहिती आणि जखमींची प्रकृती याबाबत पुढील तपशील मिळणे बाकी आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg