वरवेली (गणेश किर्वे) - महाराष्ट्र नवनिर्माण सेना, असगोली गण यांच्या वतीने गावातील नागरिकांच्या सोयीसाठी NCMC कार्ड नोंदणी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. मनसे संपर्क अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी,उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनिल हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली असगोली गण उपतालुका अध्यक्ष अमित खांडेकर यांच्या नेतृत्वात हे शिबिर पार पडले. या शिबिराला असगोली गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक नागरिकांनी NCMC कार्डासाठी नोंदणी करून या सुविधेचा लाभ घेतला. शिबिरादरम्यान अधिकृत प्रतिनिधी अमोल मोरे यांनी NCMC कार्डाचे महत्त्व, वापर, डिजिटल व्यवहारातील उपयुक्तता तसेच शासनाच्या विविध डिजिटल सेवांचा लाभ घेण्याबाबत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी मनसे तालुका सचिव प्रशांत साटले, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रथमेश रायकर, शहराध्यक्ष अभिजीत रायकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना शासनाच्या विविध डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी तसेच भविष्यातील लोकाभिमुख उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या लिंगायतवाडी ग्रामस्थ, महाराष्ट्र सैनिक, मनसे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या असगोली ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
असगोलीतील नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हे NCMC कार्ड नोंदणी विशेष शिबिर यशस्वीरित्या पार पडले. नागरिकांचा विश्वास व सहभाग हीच पुढील काळात अधिक जोमाने लोकाभिमुख आणि सर्वसामान्यांच्या हिताचे उपक्रम राबविण्याची प्रेरणा असल्याची भावना मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.