loader
Breaking News
Breaking News
Foto

बारटक्के इन्स्टिट्यूट, वन्स एन झिरोज् टेक सोल्युशन्समध्ये सामंजस्य करार

रत्नागिरी : विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यावहारिक ज्ञान, कौशल्यविकास आणि रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या बारटक्के इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संगणक प्रशिक्षण संस्था आणि वन्स-एन-झिरोज टेक सोल्युशन्स प्रा. लि. या आस्थापनेसोबत बारटक्के इन्स्टिटयूटमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या करारामुळे विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील बदलत्या गरजा समजून घेण्याची तसेच प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. प्रशिक्षण, कार्यशाळा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, इंटर्नशिप, कौशल्यविकास कार्यक्रम आणि रोजगाराभिमुख उपक्रम यासाठी दोन्ही संस्थांकडून परस्पर सहकार्य करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानाला व्यावसायिक कौशल्यांची जोड मिळावी, त्यांच्यात आत्मविश्वास व नेतृत्वगुण विकसित व्हावेत आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी ते सक्षम होतील.

टाईम्स स्पेशल

या वेळी बारटक्के इन्स्टिट्यूटच्या समन्वयक अनुजा घारपुरे तसेच वन्स-एन-झिरोज टेक सोल्युशन्सचे संचालक अमोल सहस्त्रबुद्धे व सहकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात आवश्यक कौशल्यांनी सक्षम करण्यासाठी या सहकार्याचा निश्चितच मोठा फायदा होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg