loader
Breaking News
Breaking News
Foto

"पोलीस दूत" उपक्रमाला सुरुवात; 42 विद्यार्थ्यांना अमलीपदार्थ, सायबर गुन्हे, वाहतूक नियमांवर प्रशिक्षण

सिंधुदुर्गनगरी : पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या पोलीस दूत" संकल्पनेअंतर्गत सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाणे हद्दीतील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. दि. 10 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10.30 ते 1.30 वाजेपर्यंत डॉन बॉस्को हायस्कूल, ओरोस येथे ही कार्यशाळा पार पडली. यात हद्दीतील 3 माध्यमिक/उच्च माध्यमिक विद्यालये व 8 महाविद्यालयांतील प्रत्येकी 4 विद्यार्थ्यांची असे एकूण 42 "पोलिस दूत" विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अमलीपदार्थांचे दुष्परिणाम व त्यापासून दूर राहणे, सायबर गुन्हेगारी व त्यापासून बचाव, रस्ते नियमन व त्याचे पालन, महिलांवरील अपराधांपासून कसे वाचायचे.. पोलिस अधीक्षक दहिकर यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून या संकल्पनेचा उद्देश समजावून सांगितला. प्रशिक्षणासाठी पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे, मपोनि आरिफा मुल्ला, मपोनि नलिनी शिंदे, मपोशि धनश्री भोसले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी अप्पर पोलिस अधीक्षक नायोमी साटम, डॉन बॉस्कोचे प्रिन्सिपल केल्विन उपस्थित होते. API शेखर लव्हे, पोह अमोल आखरे, पोशी राहुल कांबळे, मपोशी पावसकर यांनी आयोजन केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg