संगमेश्वर - "आजच्या शिक्षणात विद्यार्थी समाधानी नाहीत. विद्यार्थ्याना अनेक उच्च शिक्षण शाखांचा पर्याय उपलब्ध आहे. राज्य लोकसेवा व केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत अनेक युवक उच्चस्थानी अधिकारी म्हणुन कार्यरत आहेत. युवकांमध्ये प्रामाणिक कष्ट व अभ्यासात सातत्य असेल तर जिज्ञासु वृत्ती आणि जिद्दीने निश्चित ध्येय गाठुन विद्यार्थी स्पर्धा परिक्षांमध्ये यश संपादन करु शकतात, युवकांनी निश्चयपूर्वक ध्येयाने स्वतःला पुर्ण अभासकेंद्रीत बंदिस्त करणे गरजेचे आहे. सतत व्हाटस अप, इंस्टाग्राम, फेसबुक या सामाजिक माध्यमात स्वतःला गुंतवून ठेवण्यापेक्षा स्पर्धा परीक्षेत यश संपादीत करुन आपण स्वतः इतरांसाठी कसे आदर्शवत ठरु यासाठी प्रत्येक विद्यार्थी व युवकांनी प्रयत्न करावा" असे प्रतिपादन सत्यवान रेडकर (वरीष्ठ अनुवाद अधिकारी, केंद्रीय वस्तुकर व सेवाकर मुंबई भारत सरकार) यानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
भंडारी परीषद यांच्या सहकार्याने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर दादासाहेब सरफरे विद्यालय व बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना सत्यवान रेडकर यांनी स्पर्धा परीक्षांच्या पैलूंबाबत हसत खेळत मार्गदर्शन केले. यावेळी पुढे बोलताना 'स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा कल युवकांनी बदलला पाहीजे. पुर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीस प्राधान्य दिलेले बुद्धीमत्ता, गणित व भाषा विषय याचसह माध्यमिक शालांत वर्गात विद्यार्थाना अध्यापन केलेले भुगोल, नागरिकशास्त्र, मध्ययुगीन इतिहास व चालु घडामोडी यावर सातत्यपूर्वक लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे" असे सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षांबाबत विचारलेल्या प्रश्नांना रेडकर यांनी स्पर्धा परीक्षा प्रक्रिया बाबत माहिती देवून विद्यार्थांचे शंका समाधान केले. संस्थेच्या सभागृहात संपन्न झालेल्या या निःशुल्क शासकीय परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाच्या वेळी शाळा समिती अध्यक्ष दिनेश शामराव जाधव यांनी संस्था व शाळेच्या वतीने सत्यवान रेडकर यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार केला. तर आभार प्रदर्शन प्राचार्य प्रकाश भानुदास विरकर यांनी केले व सुत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका शितल सावंत यांनी केले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.