loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड मच्छी मार्केटला ‘हसनमीयां मुसा उर्फ लालूशेठ मुसा’ यांचे नाव दिल्याबद्दल रामदासभाई कदम व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे अभिनंदन

खेड - खेड शहरातील मच्छी मार्केटला ‘हसनमीयां उर्फ लालूशेठ मुसा’ यांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल माजी पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते रामदासभाई कदम यांचे आभार मानण्यासाठी तसेच त्यांचे अभिनंदन करण्यासाठी खेडमधील अल्पसंख्यांक समाजाच्या शिष्टमंडळाने त्यांची सदिच्छा भेट घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हसनमीयां उर्फ लालूशेठ मुसा यांनी खेड शहराच्या सामाजिक, व्यापारी आणि सार्वजनिक जीवनात दिलेल्या योगदानाची दखल घेत मच्छी मार्केटला त्यांचे नाव देण्यात आले आहे. या निर्णयामुळे त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान झाला असून, या निर्णयाबद्दल शिष्टमंडळाच्या वतीने रामदासभाई कदम, योगेशदादा कदम, खेड नगर पालिकेचे नागराध्यक्ष माधवी बुटाला उपनगराअध्यक्ष, गटनेते, व सर्व नगर सेवक, व नगरसेविका यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

टाईम्स स्पेशल

यावेळी अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख सिकंदर जस्नाईक, अल्पसंख्यांक शहरप्रमुख सरफराज पांगारकर, शिवसेना उपशहर प्रमुख जावेद कौचाली, सिकंदर मुसा, अलसफा वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष शमशुद्दीन खान, अल्पसंख्यांक विभागप्रमुख आसिफ जुईकर, नगरसेवक आरिफ मुलाजी, लायक महाडिक, सरफराज पोत्रिक, साहिल खान, मुस्तक जस्नाईक, अफान मुसा, फातिमा मुसा तसेच इतर पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते. हसनमीयां उर्फ लालूशेठ मुसा यांच्या स्मृतींना हा सन्मान निश्चितच अभिमानास्पद असून, खेडच्या जनतेच्या भावनांचा आदर करणाऱ्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg