खेड (प्रतिनिधी) - भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अखंड हिंदुस्थानातील लक्षावधी क्रांतीकारकांनी प्राणार्पण करून आपली राष्ट्रनिष्ठा सिद्ध केली. या पवित्र क्रांतीमध्ये खेड तालुक्याने सुद्धा आपले बहुमोल योगदान दिले आहे. अशा वीरांच्या पुण्यस्मृती जतन करण्यासाठी सन १९७३ साली खेड येथे प्रशासकीय कार्यालयाचे आवारात "क्रांतीस्तंभ" उभारण्यात आला. दिः ९ ऑगस्ट २०२६ (रविवार) रोजी "ऑगस्ट क्रांतीदिना"निमित्त "KGPA" अर्थात खेड मधील जनरल प्रॅक्टीशनर्स (डॉक्टर्स) असोसिएशन मार्फत येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास खेड तालुक्यातील डॉक्टर्स मोठया संखेने उपस्थित होते. सोबतच जेसी, लायन्स, रोटरी सह्याद्री टेनिस असोसिएशन इत्यादि संस्थांचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी कार्यक्रमास विशेष उपस्थिती दर्शवली.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वीरांच्या शौर्याच्या स्मृती जपण्यासाठी केलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे नमूद करत KGPA च्या कामाचा रोडगे यांनी गौरव केला. तर अन्यायाविरुद्ध लढण्याची उर्मी देणाऱ्या भारतीय स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या योगदानाची सदैव आठवण ठेऊन कृतिशील राहावे, असे प्रतिपादन डॉ.रईसअहमद मुजावर यांनी केले. KGPA चे अध्यक्ष डॉ परेश मळणगांवकर यांनी भारतातील गुप्त, मौर्य, सातवाहन, चालुक्य, चोल, होयसळ, काकतीय, कर्कोटक, यादव, मराठा अश्या साम्राज्याच्या कार्याची आठवण करून दिली. अनादि काळापासून राष्ट्ररक्षणासाठी अग्रेसर राहिलेल्या आणि बलिष्ठ अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या स्वभावाची आठवण ठेवणे, आणि तीच कृती करण्यासाठी आग्रही राहणे म्हणजेच या वीरांना दिलेली आदरांजली ठरेल. या स्वभावातूनच प्रेरणा घेऊन भारतीय स्वातंत्र्यलढ्याची पायाभरणी झाली.
"चले जाव " चळवळीसोबतच याच दिवशी 1925 साली काकोरी येथील सशस्त्र अभियान पूर्ण करण्यात आले होते. याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सचिव डॉ सिद्धेश चिखले यांनी मनोगत मांडताना इतिहासाचा डोळसपणे अभ्यास करून देश धर्मावरचे धोके ओळखण्यासाठी सदैव दक्ष राहिले पाहिजे. तसेच राष्ट्रनिष्ठ पिढी घडवण्यासाठी स्वातंत्रवीरांच्या विचारांचे पालन करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तसेच सर्वांचे आभार मानले. यावेळी KGPAचे खजिनदार डॉ.राजेश यादव, चेअरमन डॉ.गिल्डा उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रकल्पप्रमुख म्हणून डॉ दिग्विजय पवार यांनी अतिशय उत्तम काम पाहिले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.