loader
Breaking News
Breaking News
Foto

निकेत भालेकर यांची भाजपा युवा मोर्चा खेड शहर चिटणीस पदी तर सनीप वळवणकर यांची भाजपा युवा मोर्चा खेड शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती

खेड - खेड शहरातील भाजपा युवा मोर्चा संघटन मजबूत करण्यासाठी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष अ‍ॅड.वैभव खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निकेत भालेकर यांची भाजपा युवा मोर्चा खेड शहर चिटणीस पदी, व सनीप वळवणकर यांची भाजपा युवा मोर्चा खेड शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अँड.मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम सहिबोल, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, भाजपा खेड शहर चिटणीस अनिकेत पवार, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष पियुष माने, रोहित तांबे, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, भाजपा युवा मोर्चा कार्यकारिणी सदस्य श्वेत चोगले यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg