loader
Breaking News
Breaking News
Foto

चिवला बीचवर स्वच्छता मोहिमेत ५०० किलो कचरा संकलित

मालवण, (प्रतिनिधी) - मालवण नगरपालिकेच्या आरोग्य सभापती यांच्या संकल्पनेतून मालवण येथील चिवला बीच येथे आज मंगळवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत राबविण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहीमेत तब्बल ५०० किलो कचरा संकलित करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण नगरपालिकेच्या आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बांधकाम सभापती तथा लायन्स क्लब अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्या सहभागाने आज चिवला बीच येथे विशेष स्वच्छता मोहीम पार पडली. यावेळी लायन्स क्लबचे सदस्य, मालवण नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

टाईम्स स्पेशल

चिवला बीच परिसरातील प्लास्टिक, कचरा व इतर घाण गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. नागरिकांनीही स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समुद्रकिनारा स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश दिला. स्वच्छ समुद्रकिनारा, सुंदर मालवण या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे चिवला बीच परिसराला स्वच्छ आणि सुंदर स्वरूप प्राप्त झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg