loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्यार्थ्यांनी मेहनतीने विश्व उभे करावे - पोलीस निरीक्षक मितीश केणी

मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- शालेय जीवनात, जिद्द चिकाटी आणि महत्वाकांक्षा उरी बाळगून ध्येयाच्या वाटेने मार्गक्रमण करावे,आणि मेहनतीने शाश्वत विश्व उभे करावे असे प्रतिपादन संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मितीश केणी यांनी केले. ते माखजन इंग्लिश स्कूल च्या गुरुदक्षिणा सभागृहात बोलत होते. मितीश केणी यांनी सायबर गुन्हेगारी या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर मा.पं. शि.प्र. मंडळाचे अध्यक्ष शशिकांत घाणेकर, सहसचिव दीपक शिगवण, इंग्लिश मिडीयमच्या मुख्याध्यापिका धनश्री राजेसावंत भोसले, गणेश शिंदे,पोलीस उपनिरिक्षक भालचंद्र रेवणे आदी. उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मितीश केणी पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल वापराचे प्रमाण वाढले आहे. मोबाईच्या चुकीच्या वापराने गुन्हे ही वाढत आहे. सोबतच सायबर गुन्हेगारी वाढली आहे. तरुणानी याकडे न वळता, सन्मार्ग निवडावा असे आवाहन केले. सायबर गुन्ह्यातून होत असलेल्या आर्थिक फसवणुकीसह अन्य गुन्ह्यांची माहिती केणी यांनी मुलांना दिली. शिवाय त्यासाठी असलेले कडक नियम देखील सांगितले. परवाना नसताना दुचाकी, चारचाकी चालवली तर कोणती शिक्षा होऊ शकते, यामध्ये पालकांना कोणती शिक्षा होते याविषयी सांगितले. मुलींना कोणताही धोका उद्भवला तर पोलिसांना संपर्क साधण्यासाठी संपर्क क्रमांकही देण्यात आला.

टाइम्स स्पेशल

यामध्ये माखजन इंग्लिश स्कूल, इंग्लिश मिडीयम स्कूल सरंद,ड.पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. संस्था अध्यक्ष शशिकांत घाणेकर यांनी पोलीस निरिक्षक मितीश केणी व सहकारी यांचे स्वागत केले. यावेळी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रा संजय सूर्यवंशी यांनी केले. तर आभार गणेश शिंदे यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg