loader
Breaking News
Breaking News
Foto

कान्हे येथे नॅबतर्फे ‘नेत्र तपासणी शिबीर’ संपन्न

मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- चिपळूण नजीक कान्हे येथे आज ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या उपक्रमांतर्गत नॅब हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र, अडरे व उपकेंद्र वेहेळे यांच्या अंतर्गत आयोजित या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये एकूण ८३ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान १४ नागरिकांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाले असून, त्यांना पुढील उपचार व मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नॅब हॉस्पिटलमध्ये बोलावण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी ‘मानसी दिनेश कदम’ या अल्पदृष्टी असलेल्या मुलीचीही विशेष नेत्र तपासणी करण्यात आली. तिच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नॅब हॉस्पिटलच्या वतीने दोन शैक्षणिक गॅझेट्स देण्यात आले. या मदतीमुळे तिच्या शिक्षणाला निश्चितच हातभार लागणार आहे. हे शिबिर वैद्यकीय अधिकारी मयेकर व फडके यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. या कार्यक्रमासाठी आरोग्य सहायिका उषा जाधव, आरोग्य सेवक निखिल वारके, आशा प्राजक्ता मोडक व मदतनीस सकपाळ उपस्थित होत्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg