loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा शहरातील खड्डेमय रस्त्यावर खड्ड्यात वृक्षलागवड करण्यात येणार: दाजी गडहिरे

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा नगरपंचायत हद्दीतील रस्ते खड्डेमय झाले आहेत. रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता? हेच समजत नाही. अत्यंत दुरावस्था झालेल्या रस्त्यावरील खड्डे १५ ऑगस्ट पूर्वी भरले नाही तर खड्यात वृक्षारोपण करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लांजा तालुकाध्यक्ष दाजी गडहीरे यांनी निवेदनाद्वारे लांजा नगरपंचायतीला दिला आहे. लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात लांजा नगरपंचायतीला गेल्या तीन ते चार वर्षांत विकास कामांसाठी करोडो रुपयांचा निधी आलेला आम्ही लांजा शहरात लावलेले बॅनर बघीतले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच ते सर्व टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून. कामे सुद्धा झाली आहेत. परंतु सर्व कामे निकृष्ट दर्जाची झाली असून सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. तरी याला जबाबदार कोण? ठेकेदार, प्रशासन की लोकप्रतिनिधी हे आपण ठरवावे. व जबाबदार व्यक्तीवर कारवाई करावी. तसेच जर ठेकेदार जबाबदार असेल तर प्रशासन कारवाई का करत नाही. जर प्रशासन जबाबदार असेल तर लोकप्रतिनिधी शांत का? असे निवेदनात नमूद केले आहे. तरी सर्व खड्डे १५ ऑगस्टपूर्वी भरले नाही तर रस्त्यामधील खड्ड्यात वृक्षलागवड केली जाणार आहे, तरी आपण लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी दाजी गडहीरे यांनी केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg