मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- फुणगूस खाडीभागातील कोंडये येथील अत्यंत प्रतिष्ठित आंबा व्यावसायिक तथा कोंडये गावच्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सागर देसाई यांच्या निवासस्थानी एक अत्यंत दुर्मिळ आणि नयनरम्य निसर्गचमत्कार पाहायला मिळाला आहे. सागर देसाई यांच्या अंगणात रात्रीच्या वेळी अत्यंत दुर्मिळ मानले जाणारे आणि पवित्रतेचे प्रतीक असलेले ‘ब्रह्मकमळ’ पूर्ण वैभवासह उमलले. या अलभ्य आणि पवित्र क्षणाचे औचित्य साधत देसाई यांनी हे शुभ्रधवल ब्रह्मकमळ डावखोल येथील प्रसिद्ध सोमेश्वर मंदिरात नेऊन पूजर्यांच्या हस्ते भगवान महादेवाच्या पिंडीवर अर्पण केले. या भक्तिमय आणि मनमोहक दृष्याने देसाई कुटुंबासह संपूर्ण कोंडये परिसरात आनंदाचे आणि मांगल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
सागर देसाई हे केवळ एक यशस्वी व्यावसायिक किंवा सामाजिक कार्यकर्ते नसून, परिसरात एक सच्चे आणि आग्रही निसर्गप्रेमी म्हणून ओळखले जातात. लहानपणापासूनच त्यांना वेगवेगळ्या प्रकारची दुर्मिळ झाडे आणणे, त्यांची लागवड करणे आणि एखाद्या लहान बालकाप्रमाणे त्यांचे संगोपन करण्याचा एक वेगळाच ध्यास व छंद आहे. कामाच्या व्यापातून वेळ काढत त्यांनी आपल्या अंगणात विविध वृक्ष-वल्लींची जपणूक केली आहे. त्यांनी जपलेल्या याच चिकाटीला आणि वृक्षांप्रती असलेल्या अपार प्रेमाला जणू निसर्गाने दिलेली ही एक अनोखी आणि अनमोल पावतीच मानली जात आहे. ‘ब्रह्मकमळ’ हे वनस्पती जगतातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि पवित्र मानले जाणारे फुल आहे. हे फुल वर्षातून केवल एकदाच फुलते आणि तेही फक्त रात्रीच्या वेळी काही तासांसाठीच आपले सौंदर्य बिखेरते. सागर देसाई यांच्या घरी हे ब्रह्मकमळ फुलताच त्यांनी दिवा, आरतीची थाळी आणि अगरबत्ती लावून या पवित्र फुलाची पूजा-अर्चा केली. त्यानंतर, अत्यंत श्रद्धेने हे अलभ्य ब्रह्मकमळ डावखोल येथील श्री सोमेश्वर मंदिरात नेण्यात आले. तेथे मंदिराच्या पूजर्यांच्या हस्ते विधीवत पूजा करून हे ब्रह्मकमळ भगवान सोमेश्वराच्या(महादेवाच्या)पिंडीवर वाहण्यात आले. शिवपिंडीवर विराजमान झालेले हे शुभ्र ब्रह्मकमळ अत्यंत अलौकिक आणि विलोभनीय दिसत होते.
ब्रह्मकमळ फुलल्याची बातमी वार्यासारखी परिसरात पसरताच, हे दुर्मिळ दृश्य पाहण्यासाठी अनेक गावकर्यांनी व निसर्गप्रेमींनी देसाई यांच्या निवासस्थानी आणि मंदिरात धाव घेतली. निसर्गाची ही अनोखी किमया पाहून सर्वजण भारावून गेले. अनेकांनी या अलभ्य फुलाचे आणि सोमेश्वर मंदिरातील शिवपिंडीवर पूजर्यांच्या हस्ते वाहिलेल्या ब्रह्मकमळाचे विलोभनीय क्षण आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केले. रात्रीपासूनच परिसरातील नागरिकांच्या आणि तरुणांच्या व्हाट्सऍप स्टेटसवर सागर देसाई यांच्या अंगणातील हे ब्रह्मकमळ आणि मंदिरातील शिवपिंडीचे फोटो मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. लहानपणापासूनच मला वेगवेगळ्या वनस्पती आणि दुर्मिळ झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची आवड आहे. निसर्गाची सेवा करणे हा माझ्या दृष्टीने एक ध्यास आहे. आज माझ्या अंगणात हे अलभ्य ब्रह्मकमळ फुललेले पाहून मनस्वी आनंद आणि समाधान वाटले. हे केवळ माझ्या प्रयत्नांचे फळ नसून निसर्गाचा आणि महादेवाचा एक अनमोल आशीर्वाद आहे. हे पवित्र फुल फुलल्याचे कळताच मी सर्वप्रथम डावखोल येथील श्री सोमेश्वर मंदिरात पूजर्यांच्या हस्ते भगवान महादेवाच्या पिंडीवर हे ब्रह्मकमळ अर्पण केले. या दुर्मिळ फुलाचे दर्शन घेऊन महादेवाच्या चरणी गावातील सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. ग्रामस्थांनी आणि निसर्गप्रेमींनी दाखवलेले प्रेम आणि कौतुक माझ्या निसर्गसंवर्धनाच्या छंदाला अधिक बळ देणारे आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.