loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्हा ऍथलेटिक्स स्पर्धेत अनुष्का दोरकडेची चमकदार कामगिरी; १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम स्थान मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- रत्नागिरी जिल्हा हौशी थलेटिक्स संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ’रत्नागिरी जिल्हा थलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा २०२६’ मध्ये संगमेश्वर तालुक्याची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. तालुक्यातील बुरंबी येथील दादासाहेब सरफरे विद्यालयाची गुणवंत विद्यार्थिनी अनुष्का अनिल दोरकडे हिने आपल्या अप्रतिम क्रीडा कौशल्याच्या जोरावर या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अनुष्काने आपल्या वेगवान धावण्याच्या शैलीने उपस्थितांची मन जिंकत प्रथम क्रमांक पटकावला आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले. या यशाच्या बळावर तिची आगामी राज्यस्तरीय थलेटिक्स स्पर्धेसाठी थेट निवड झाली आहे. ही जिल्हास्तरीय स्पर्धा डेरवण येथील क्रीडा संकुलात ९ ऑगस्ट २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. जिल्ह्यातील अनेक दिग्गज व उदयोन्मुख खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या कडक स्पर्धेत अनुष्काने १०० मीटर अंतर अवघ्या १७.८९ सेकंदांत पार करत अव्वल स्थान पटकावले आणि उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अनुष्काचा हा विजय योगायोग नसून तिच्या अथक परिश्रमाचे फलित आहे. यापूर्वीदेखील तिने रत्नागिरी जिल्हा थलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा २०२५ मध्ये आपल्या कौशल्याची छाप पाडली होती. त्यावेळी तिने उंच उडी प्रकारात १.१० मीटरची यशस्वी कामगिरी नोंदवत प्रथम क्रमांक मिळवला होता, तर २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ३५.०२ सेकंदांची वेळ नोंदवून द्वितीय क्रमांक (रौप्यपदक) पटकावला होता. तिच्या या सातत्यपूर्ण यशामुळे ती जिल्हा क्रीडा वर्तुळात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. अनुष्का दोरकडेच्या या दिमाखदार यशाने बुरंबी गाव, तिचे दादासाहेब सरफरे विद्यालय आणि पर्यायाने संपूर्ण संगमेश्वर तालुक्याच्या वैभवात मोलाची भर पडली आहे. ग्रामीण भागातून पुढे येत तिने नोंदवलेली ही कामगिरी क्रीडाप्रेमींसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरली आहे.

टाइम्स स्पेशल

अनुष्का दोरकडेच्या या दैदिप्यमान यशाबद्दल आणि राज्यस्तरीय स्पर्धेतील निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून जोरदार कौतुक होत आहे. रत्नागिरी जिल्हा हौशी थलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष महादेव कदम आणि सचिव संदीप तावडे यांच्यासह जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर, तिचे मार्गदर्शक शिक्षक, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, बुरंबी ग्रामस्थ व संगमेश्वर तालुक्यातील सर्व नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.आगामी राज्यस्तरीय स्पर्धेत ती रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना पुन्हा एकदा अशीच चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करत तिला भावी क्रीडा प्रवासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg