(दापोली-सागर गोवळे)वानोशी तर्फ पंचनदी (धातोंडी वाडी) - ग्रामीण कृषी कार्य अनुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत वानोशी तर्फ पंचनदी येथे यजमान शेतकरी अरुण उजाळ यांच्या शेतात ‘कृषी सखी’ गटातील विद्यार्थिनींनी केळीच्या शास्त्रीय लागवडीचे आणि उपपदार्थांचे प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पार पाडले. या कार्यक्रमास परिसरातील ११ शेतकर्यांनी उत्साहाने हजेरी लावली. शेतकर्यांना कमकुवत ‘पाणी कोंब’ आणि पुनर्लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त अशा जोमदार ‘स्वोर्ड (तलवार) कोंबां’मधील फरक समजावून सांगण्यात आला. मुख्य झाडाची वाढ उत्तम व्हावी यासाठी पाणी कोंब कापून, त्यावर पुन्हा उगवण होऊ नये म्हणून रॉकेलचे थेंब टाकण्याचे सोपे तंत्र दाखवण्यात आले. ३ ते ४ महिने वयाच्या आणि ५०-७५० ग्रॅम वजनाच्या स्वोर्ड कोंबांची निवड करून, मुख्य झाडाला इजा न पोहोचवता त्यांची काढणी व २०-२५ सेमी खोलीच्या खड्ड्यांत पुनर्लागवड करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) विकसित रोगमुक्त आणि जलद वाढणार्या टिश्यू कल्चर रोपांची माहिती पायल मोरे व मधुजा घडशी यांनी दिली. रोपांचे दर पुढीलप्रमाणे आहेत: जी-९: ₹१४/- प्रति रोप, सफेद वेलची: ₹२०/- प्रति रोप, लाल वेलची (रेड बनाना): ₹३०/- प्रति रोप, केळीचे उपपदार्थ व मूल्यवर्धन: केळीच्या खोडापासून मिळणारे तंतू (दोर/चटईसाठी), पाने, पौष्टिक मोहोर (भाजीसाठी), तसेच फळांपासून बनणारे चिप्स, प्युरी आणि सेंद्रिय खताचा वापर यावर मार्गदर्शन करून कचर्यातून उत्पन्नाचा मार्ग दाखवण्यात आला.
हे प्रात्यक्षिक डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुंकरकर, RAWE समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रभारी डॉ. विजय देसाई, विषय तज्ज्ञ डॉ. महेश एम. कुलकर्णी, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशीष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. कार्यक्रमाचे नियोजन कृषी सखी गटाच्या विद्यार्थिनी कु. शबरी चव्हाण, संजना जंगले, मधुजा घडशी, पायल मोरे, रिंकू बाजीया, तरला श्रीदेवी, दिविलीयू, देवीप्रिया पी. टी., श्रीलया एम., मुस्कान कसोटीया आणि नित्या राज यांनी केले. या उपक्रमामुळे आधुनिक केळी उत्पादनाबाबत शेतकर्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.