loader
Breaking News
Breaking News
Foto

कुवारबाव येथे तीन डंपरची धडक; ब्रेक फेल झाल्याने अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

रत्नागिरी (जमीर खलफे) : रत्नागिरीतील कुवारबाव परिसरात आज सकाळी सुमारे १०:४५ वाजण्याच्या सुमारास तीन डंपरचा विचित्र अपघात झाला. एमआयडीसी रस्त्याकडे जाण्यासाठी थांबलेल्या डंपरला मागून येणाऱ्या डंपरचे अचानक ब्रेक फेल झाल्याने जोरदार धडक बसली. त्यानंतर हा डंपर रिव्हर्स मागे येत असताना पाठीमागून येणाऱ्या तिसऱ्या डंपरलाही धडक बसली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसून मोठी दुर्घटना टळली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, कुवारबाव येथे डंपर क्रमांक MH 08 DD 7794 हा एमआयडीसी रोडकडे जाण्यासाठी थांबला होता. याचवेळी मागून येणाऱ्या MH 08 AP 2637 या डंपरचे अचानक ब्रेक लागले नाहीत. चालक अमीन रेड्डी यांच्या ताब्यातील या डंपरने पुढे थांबलेल्या डंपरला जोरदार धडक दिली. धडकेनंतर संबंधित डंपर रिव्हर्स मागे येत असताना त्याची पाठीमागून येणाऱ्या MH 08 W 2900 या तिसऱ्या डंपरला धडक झाली.

टाईम्स स्पेशल

या अपघातात तिन्ही डंपरचे नुकसान झाले आहे. मात्र, अपघाताची तीव्रता पाहता कोणालाही दुखापत झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेनंतर कुवारबाव परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg