वरवेली(गणेश किर्वे)- गुहागर तालुक्यातील वरवेली शाळा नं.१ ला सन २०२५/२६ चा आदर्श प्राथमिक शाळा पुरस्कार प्राप्त झाल्याने शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांचा अभिनंदन व सत्कार सोहळा गुहागर पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे यांच्या हस्ते शाळेमध्ये पार पडला. या अभिनंदन व सत्कार सोहळ्यासाठी वरवेली ग्रामपंचायतचे सरपंच नारायण आगरे, पत्रकार गणेश किर्वे, केंद्रप्रमुख मीनाक्षी पवार, शिक्षणतज्ञ जितेंद्र विचारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप रांजाणे, माजी अध्यक्ष विशाल रांजाणे, गणेश रांजाणे, समीर महाडिक, मनस्वी किर्वे, आशिकी चांदोरकर, पोर्णिमा गमरे, दिपाली पवार, शाळेचे मुख्याध्यापक समीर पावसकर, शिक्षिका अर्चना वाकडे उपस्थित होते.
वरवेली गावातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून १४ लाख रुपये निधी जमा करून शाळेच्या इमारतीची रंग-रंगोटी, डिजिटल क्लासरूम, अद्ययावत प्रयोगशाळा, संगणक कक्ष, वाचनालय, सौर पॅनल व संपूर्ण शाळेच्या इमारतीवर पत्र्याची शेड, गार्डन, रंगमंच तसेच रंगमंचावर पत्र्याची शेड तसेच इतर कामे लोक सहभागातून करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या आर्थिक सहभागातून सायन्स व इंग्रजी विषय विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एका उच्च शिक्षित शिक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. शाळेच्या विविध सुविधांसाठी ज्या ग्रामस्थांनी तसेच देणगीदारांनी सहकार्य केले व त्या कामी विशेष मोलाचे योगदान देणार्या शाळा व्यवस्थापन समिती सर्व शिक्षक पालक व ग्रामस्थ यांचे विशेष अभिनंदन गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे यांनी केले. या शाळेमध्ये शिक्षकाची नेमणूक लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती देखील गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे यांनी दिली.
केंद्रप्रमुख मीनाक्षी पवार यांनी शाळेची पटसंख्या वाढण्यासाठी या परिसरातील विद्यार्थी बाहेर जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, येथील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शाळेच्या पत्राशेडसाठी आर्थिक सहकारी करणारे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडचे चेअरमन (अध्यक्ष) डॉ. तानाजीराव लक्ष्मण चोरगे तसेच वरवेली येथील उद्योजक योगेंद्र विचारे, शाळेचे माजी विद्यार्थी व उच्च पदावर कार्यरत असलेले सुशील बाळकृष्ण पवार यांचे विशेष आभार यावेळी मानण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक समीर पावसकर यांनी केले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.