loader
Breaking News
Breaking News
Foto

‘सुजलाम सुफलाम माझा देश’ बालकलाविष्कारातून साकारला राष्ट्रभक्तीचा सोहळा, पर्ण विकास मंच आणि युवा महाराष्ट्र प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम

पनवेल - मुले हीच आपली गुंतवणूक असून स्टेटस च्या मागे लागू नका. देश सुजलाम सुफलाम करण्या करिता मुलांवर संस्कार करण्याचे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे सहआयुक्त, विचारवंत, साहित्यिक जमीर लेंगरेकर यांनी पनवेल येथे केले. पर्ण विचार मंच आणि युवा महाराष्ट्र प्रतिष्ठान आयोजित ‘सुजलाम सुफलाम माझा देश’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ‘जमीर लेंगरेकर’ उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आमदार विक्रांत पाटील उपस्थित होते. ‘वंदे मातरम्’ या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने बालकलाकारांचा वाचन, नाट्य, गायन, नृत्याविष्कार यांनी सजलेला सुजलाम सुफलाम हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवेदनासह संपूर्ण सादरीकरण हे बालकलाकारांनीच केले होते. धरती, पाणी, शेती, देश यावर आधारित असलेल्या कविता मुलांनी सादर केल्या तर वंदे मातरमचे महत्व आणि इतिहास सांगणारे अभिवाचन बालकलाकारांनी केले. आपणच आहोत. आपल्या धरतीचे शिल्पकार हे नाट्य यावेळी सादर करण्यात आले. स्पृहा मराठे हिचे कीर्तन विशेष उल्लेखनीय ठरले तर बीज अंकुरे, आईसारखे दुसरे दैवत, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, धरतीची आम्ही लेकरं, मंगल देशा पवित्र देशा, क्रांती जिंदाबाद यासारखी ऊर्जा देणारी आणि धरतीची महती सांगणारी गाणी बालकलाकारानी सादर केली. सुजलाम सुफलाम धरती करायची असेल तर माती बरोबरच मन, समाज, कुटुंबसुद्धा सुपीक करावे लागतील. हा संदेश आता जोशी हिच्या निवेदनातून दिला. पाणी, शेतकरी एकता या गोष्टी सुजलाम सुफलाम करण्यात महत्त्वाच्या ठरतात. हा संदेश देणारी नृत्य यावेळी सादर करण्यात आली. सण उत्सवातूनही मनाची मशागत होत असते. याकरिता संपूर्ण सणांचा आढावा घेणार्‍या नृत्याने उपस्थित यांची वाहवा मिळवली. यावेळी वंदे मातरमचा नृत्यातून अविष्कार हा कार्यक्रमाचा मैलाचा दगड ठरला.

टाइम्स स्पेशल

बालकलाकारांनी देशाप्रती सादर केलेल्या सर्वच सादरीकरणाने वातावरण देश भक्तीमय होऊन गेले होते. प्रास्ताविकात अपर्णां नाडगौडी यांनी पर्ण दिवाळी अंकाबरोबरच पर्ण विकास मंचच्या वतीने साहित्यिक सांस्कृतिक सामाजिक चळवळ राबत असल्याचे सांगितले तर युवा महाराष्ट्र प्रतिष्ठानच्यावतीने मोहिनी विक्रांत पाटील यांनी झेन अल्फा आणि जेन झी मुलांवर सकारात्मक परिणाम करण्याकरिता संस्कार महत्त्वाचे असल्याने अशा पद्धतीचे प्रत्येक उपक्रम राबवण्यास आपण तयार असल्याचे सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg