loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्रमांक १९ आंबेशेत शाळेचे नाव शिष्यवृत्ती परीक्षेत झळकले

रत्नागिरी (वार्ताहर) - श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्रमांक १९ आंबेशेत शाळेतील विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत विद्यार्थी झळकले आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणार्‍या स्कॉलरशिप परीक्षेत श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर, रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक १९ आंबेशेत शाळेतील इयत्ता चौथीतील नील रितेश सावंत आणि सार्थक निलेश वाडेकर स्कॉलरशिप परीक्षेत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत आले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इयत्ता पाचवीतील स्वरा महादेव गुरवने स्कॉलरशिप परीक्षेत रत्नागिरी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक १९ आंबेशेत या शाळेतील स्कॉलरशिप परीक्षेतील गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि शाळेचे मुख्याध्यापक नागेंद्र कणमुसे, शिक्षक विनय कांबळे, शिक्षिका वर्षा म्हादे आदी शिक्षक वृंदांचे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा संचिता सचिन भाटकर आणि सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ, पालक या सर्वांच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन केले जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg