पनवेल - पनवेल येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) परिसरात एडीसी नावाखाली कथितपणे सुरू असलेल्या अनधिकृत दलाली, नागरिकांची दिशाभूल आणि आर्थिक गैरव्यवहारांविरोधात १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता खारघर येथील सेक्टर-३६ मधील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शहबाज फारुक पटेल यांनी दिली.
शहबाज फारुक पटेल यांनी सांगितले की, ‘‘या प्रकरणी प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी तक्रारी, निवेदने आणि स्मरणपत्रे सादर करण्यात आली. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई अथवा समाधानकारक अहवाल न मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या हितासाठी आरटीओ कार्यालयातील कामकाज पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि दलालमुक्त करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.’’ या आंदोलनामध्ये एडीसी नावाखाली सुरू असल्याचा आरोप असलेल्या कथित अनधिकृत दलालीची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करावी, आरटीओ कार्यालयातील सर्व कामकाज पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करण्यात यावे, सर्व कक्षांमध्ये उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच नागरिकांसाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना आणि प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करावी, अशा प्रमुख मागण्या प्रशासनाकडे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने करण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली जाईल, असे शहबाज फारुक पटेल यांनी सांगितले. तसेच प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.