loader
Breaking News
Breaking News
Foto

निवेंडी येथे होवू घातलेल्या मँगो कॅश्यू पार्कच्या एमआयडीसी जमीन खातेदारांचा मोबदला लवकरच मिळणार, प्रशासनाकडे १२० कोटी प्राप्त

रत्नागिरी : तालुक्यातील निवेंडी येथे होऊ घातलेल्या मँगो कॅश्यू पार्कच्या दृष्टीने एमआयडीसीसाठी महसूल प्रशासनाला १२० कोटी रुपये प्राप्त झाले असून निवेंडी व तळेकरवाडी परिसरातील ४४६ खातेदारांना पुढील काही दिवसात मोबदला वाटप प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. भूसंपादनासाठी गुंठ्याला २८ हजार ५८८ रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दोन वर्षापूर्वी रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी परिसरात जवळपास १०० हेक्टरवर मँगो कॅश्यू पार्कच्या दृष्टीने एमआयडीसी उभारण्याचे जाहीर केले होते. त्यादृष्टीने मोजणी प्रक्रियाही पार पडली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवेंडी येथे ९१.२३.०० हे.आर. तर तळेकरवाडी येथे ७.५६.०० हे.आर. अशी ९८.७९.०० हे.आर.जागा निश्चित करण्यात आली होती. याबाबत परिसरातून ४५ हरकतीही दाखल झाल्या होत्या. त्यावरही सुनावणी पार पडली होती. निवेंडी व तळेकरवाडी मिळून ७/१२ ची संख्या ९९ असून निवेंडीमध्ये ४०३ तर तळेकरवाडी येथे ४३ असे ४४६ खातेदार आहेत. या ठिकाणी गुंठ्याला २८ हजार ५८८ रुपये दर नगररचनाकार यांच्याकडे पाठविण्यात आलेल्या दरानुसार एमआयडीसीने हे दर निश्चित करण्यात आले असून हेक्टरी २८ लाख ५८ हजार ८०० रुपये हेक्टरी दरानुसार प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

टाईम्स स्पेशल

त्यानुसार १२० कोटी रुपये एमआयडीसीकडून प्राप्त झाले आहेत. याबाबत लवकरच प्रांतकार्यालयाकडून मोबदला वाटप सुरु होणार आहे. प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी एमआयडीसी भूसंपादनासाठी महत्वाची भूमिका बजावली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg