loader
Breaking News
Breaking News
Foto

शिष्यवृत्ती परीक्षेत रोटरी स्कूलचे 31 विद्यार्थी उत्तीर्ण, 4 विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत समावेश

खेड - महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांचेमार्फत घेण्यात आलेल्या इ 4 थी व इ. 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमधील 31 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 4 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावून शाळेचे नाव गौरवित केले. शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता, तर्कशक्ती, आकलन आणि अभ्यासातील सातत्य यांची चाचणी घेणारी महत्त्वाची परीक्षा आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आत्मविश्वास आणि भक्कम पाया मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात या परीक्षेला विशेष महत्त्व आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर परीक्षेसाठी इ. 4 थी मधील शौर्या शिवाजी मोरे हिने जिल्हा गुणवत्ता यादीत 17 वा व श्रीष गणेश पाटील याने 19 वा क्रमांक प्राप्त केला आहे. तर इ. 7वी मधील ईश्वरी विजयकुमार माळी हिने जिल्हा गुणवत्ता यादीत 11 वा व श्रुती श्रीराम खेडेकर हिने 24 वा क्रमांक प्राप्त करुन शाळेचे नाव गौरवित केले आहे. विद्याथ्र्यांच्या या यशामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टाईम्स स्पेशल

संस्थेचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg