loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलच्या आर्या खेडेकर हिचे वक्तृत्व स्पर्धेत उल्लेखनीय यश

खेड (प्रतिनिधी) - आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन, दापोली संचालित न. का. वराडकर कला व रा. वि. बेलोसे वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, दापोली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मातोश्री इंदुमती यादव वक्तृत्व स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलची विद्यार्थिनी आर्या अमित खेडेकर हिने सहभाग नोंदवत तृतीय क्रमांक पटकावला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली, मंडणगड व खेड तालुक्यांतील कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या वक्तृत्व स्पर्धेमध्ये आर्या हिने क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान या विषयावर प्रभावी वक्तृत्व व उत्कृष्ट सादरीकरण करत तृतीय क्रमांकाला गवसणी घातली. तिच्या या कामगिरीबद्दल तिला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

टाईम्स स्पेशल

आर्याला या स्पर्धेसाठी शाळेतील मराठी विषय शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. रोटरी स्कूलचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आर्या खेडेकर हिचे अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg