loader
Breaking News
Breaking News
Foto

शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूलचे घवघवीत यश २३ विद्यार्थी पात्र; गुणवत्ता यादीतही विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - शैक्षणिक क्षेत्रातील उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय, लांजाच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यालयातील तब्बल २३ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र ठरले असून, विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेची उल्लेखनीय छाप उमटवली आहे. विशेष म्हणजे विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी शहरी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. गुणवत्तेत हार्दिक महेश कुरूप याने २३२ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला असून, त्याचा शहरी गुणवत्ता यादीत २५ वा क्रमांक आला आहे. श्लोक स्वप्निल चव्हाण याने २१६ गुणांसह द्वितीय, दुर्वा गजानन विभुते हिने २०८ गुणांसह तृतीय, स्वरा भालचंद्र बोडस हिने २०२ गुणांसह चतुर्थ, तर मेघ:श्याम आनंद मुळे याने २०० गुणांसह पाचवा क्रमांक मिळवला.

टाईम्स स्पेशल

या विद्यार्थ्यांनी शहरी गुणवत्ता यादीत अनुक्रमे २५, ५०, ७१, ८८ आणि ९३ असा उल्लेखनीय क्रमांक मिळवत विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची चिकाटी, सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनत, तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे नियोजनबद्ध प्रयत्न आणि पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शालेय प्रशासन, संस्था, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दील्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg