loader
Breaking News
Breaking News
Foto

विजयदुर्ग किल्ल्यावर १८ ऑगस्टला जागतिक हेलियम दिनाचे आयोजन

देवगड - विज्ञानाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना आणि विजयदुर्ग किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा यांचा अनोखा संगम घडवून आणण्यासाठी १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर ‘जागतिक हेलियम दिन–२०२६’ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विजयदुर्ग किल्ल्याशी निगडित ऐतिहासिक आणि वैज्ञानिक वारशाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, तसेच विज्ञान, इतिहास, पर्यटन आणि स्थानिक अस्मिता यांचा सुंदर मिलाफ घडवून आणणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. विज्ञानप्रेमी, इतिहास संशोधक, विद्यार्थी, शिक्षक, स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांसाठी हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार तसेच आमदार व विजयदुर्गच्या ऐतिहासिक-सांस्कृतिक वारशाचे अभ्यासक प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

टाईम्स स्पेशल

‘विजयदुर्गचा इतिहास – विज्ञानाची अद्भुत गाथा – आणि भविष्याच्या पिढ्यांसाठी प्रेरणेचा दीप’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे विजयदुर्गच्या ऐतिहासिक वारशाला तसेच वैज्ञानिक महत्त्वाला व्यापक व्यासपीठ मिळणार आहे. विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित या ऐतिहासिक सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg